भजनी मालिका
← भजनांकडे परत

कानावाटें मी नयनासी आलों । शेखीं नयनाचा नयन मी जाहलों

kanavaten mi nayanasi alon | shekhin nayanacha nayan mi jahalon

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कानावाटें मी नयनासी आलों । शेखीं नयनाचा नयन मी जाहलों ॥१॥ दृष्टीद्वारां मी पाहे सृष्टीं । सृष्टी हरपली माझें पोटी ॥२॥ ऐसं जनार्दनें मज केलें । माझें चित्ताचें जीवपण नेलें ॥३॥ एका जनार्दनीं जाणोनि भोळा । माझा सर्वांग जाहला डोळा ॥४॥