भजनी मालिका
← भजनांकडे परत

काढी काढी भ्राती देहाची सर्वथा । प्रपंचाची चिंता नको तुज

kadhi kadhi bhrati dehachi sarvatha | prapanchachi chinta nako tuj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काढी काढी भ्राती देहाची सर्वथा । प्रपंचाची चिंता नको तुज ॥१॥ सर्वभावें शरण विठठलासी जाई । ठायीचाचि ठायीं निवारिल ॥२॥ देह गेह माझें म्हणणें हें दुजें । सर्व विठ्ठलाराजे समपीं तुं ॥३॥ एका जनार्दनी करी आठवण । चिंती तुं पावन परब्रह्मा ॥४॥