भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती काकुलती यावें । किती वेळां फजीत व्हावें

kiti kakulati yaven | kiti velan phajit vhaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
किती काकुलती यावें । किती वेळां फजीत व्हावें ॥१॥ न भीचि तो यमदंडा । जैसा मेंढा मातलासे ॥२॥ भलतिया वरी धांवें । श्वान जैसें ते स्वभावें ॥३॥ एका जनार्दनीं जाण । वाहतो देवाची तो आण ॥४॥