भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनाची आवडी मोठी । प्रेमें देव घाली मिठी

kirtanachi avadi mothi | premen dev ghali mithi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कीर्तनाची आवडी मोठी । प्रेमें देव घाली मिठी ॥१॥ कीर्तन प्रिय पैं गोविंदा । आदरें पूजितो नारदा ॥२॥ कीर्तन करिता अभेदु । आदरें रक्षिला प्रल्हादु ॥३॥ राजेंद्र करी नामस्मरण । धांवण्या धांवे नारायण ॥४॥ एका जनार्दनीं कळवळा । भक्तालांगीं देव भोळा ॥५॥