भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती वेळां जन्म किती वेळां मृत्यु । हाचि न कळे अंतु भाग्यहीना

kiti velan janma kiti velan mrutyu | hachi na kale antu bhagyahina

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
किती वेळां जन्म किती वेळां मृत्यु । हाचि न कळे अंतु भाग्यहीना ॥१॥ जन्मोनीं संसार मानितां बरवा । परि या राघवा शरण न जाय ॥२॥ पावलिया मरण सहज नरक कुंडीं । कोण तया सोडी अधमासी ॥३॥ स्वप्नामाजीं नेणें परमार्थ मानसीं । सदा चौर्‍यांयंशी फेरे भोगी ॥४॥ एका जनर्दनीं नोहेंचि सुटिका । भाग्यहीन देखा मरे जन्में ॥५॥