भजनी मालिका
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.

संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली. वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतांमध्ये त्यांचे स्थान अग्रगण्य आहे. आळंदी येथे त्यांची संजीवन समाधी आहे.

या संतांची भजने

सुंदर सुरेख वोतिलें । परब्रह्म तेज फ़ांकलें । तें व्योमीं व्योम सामावलें । नयनीं वो माय ॥१॥ कमळनयन सुमन फ़ांकलें । त्या परिमळा आथिलें । मकरंदीं वो माय ॥ध्रु०॥

सुनीळ गगना पालटु । तैसा दिसे अंगीं नटु । कृष्णी बाणलासे नीळवर्णु गे माये ॥१॥ यमुनेच्या पाबळीं । तनु घेउनि सांवळि । पावा वनमाळी वाजतु आसे ॥ध्रु०॥