भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुकलिये गंगे व‍र्‍हाड आलें

sukaliye gange va‍r‍had alen

सुकलिये गंगे व‍र्‍हाड आलें । उतार नाहीं म्हणोन मुरडोनी गेलें । मनगुणीचा तंती ओंविली धरणी । पिसोळिया ओझें वाईले रया ॥१॥ तुं ते कवण मी ते कवण । कवण बांधावे तोरण । योगी दिगंबर संन्यासिजे काय । वरमाये हातीं कांकण रया ॥२॥ आप तेज पृथ्वी वायो आकाश । या भासास उटणें केलें । वांझेचिया पुत्रा चोखणी मार्दिलें । ऐसें नवल ज्ञान जालें रया ॥३॥ वरबाप वोहबाप जन्मलेचि नाहीं । तंव नवरा नवरी कवणची काई । बापरखुमादेवीवर चिंतिता । तरि तें सुख निवृत्तिपायीं ॥४॥