भजनी मालिका
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.

संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली. वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतांमध्ये त्यांचे स्थान अग्रगण्य आहे. आळंदी येथे त्यांची संजीवन समाधी आहे.

या संतांची भजने

सारसार दोन्ही । न दिसती नयनीं । अवचिता गगनीं । बिंबलासे ॥१॥ लोपले रविशशि । तेज न माये आकाशीं । मेघ:श्याम मेघाशीं । लपविलें ॥ध्रु०॥

सांवळियाचें तेज सांवळा श्रीहरि । शेज बाज वोवरी ब्रह्मांडाची ॥१॥ गृहदारा दिनमणि तेज देऊनि मेदिनी । मेरु प्रदक्षणि आप होय ॥ध्रु०॥

सांवळेचें तेज सांवळे बिंबलें । प्रेम तें घातलें ह्रदयघटीं ॥१॥ निरालंब बाज निरालंब तेज । चित्तरस निज निजतेजें ॥ध्रु०॥