भजनी मालिका
← भजनांकडे परत

सायुज्य सदन श्यामाचिये घरीं

sayujya sadan shyamachiye gharin

सायुज्य सदन श्यामाचिये घरीं । ह्रदयकल्हारीं श्यामतनु ॥१॥ सचेत अचेत नित्यता विरक्त । असोनि अलिप्त जन्ममरणा ॥२॥ नारायण साध्य साधक साधिता । विग्रह पूर्णता आंगी लागे ॥३॥ ज्ञानदेवी मौनीं गुणग्रास धाम । सर्वत्र आराम हरी माझा ॥४॥