भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांवळेचें तेज सांवळे बिंबलें । प्रेम तें घातलें ह्रदयघटीं

sanvalechen tej sanvale bimbalen | prem ten ghatalen hradayaghatin

सांवळेचें तेज सांवळे बिंबलें । प्रेम तें घातलें ह्रदयघटीं ॥१॥ निरालंब बाज निरालंब तेज । चित्तरस निज निजतेजें ॥ध्रु०॥ आदिमध्यंअत राहिला अनंत । न दिसे द्वैताद्वैत आम्हां रया ॥२॥ ज्ञानदेवीं सोय अवघाचि सामाय । सुखदु:ख माय आम्हां नाहीं ॥३॥