भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांवळी प्रतिमा घेऊनि सकुमार

sanvali pratima gheuni sakumar

सांवळी प्रतिमा घेऊनि सकुमार । खेळत सुंदर गोकुळीं रया ॥१॥ त्या रुपें वेधिलें काय करुं माये । अवघें निर्गुणचि होय पाचारितां ॥२॥ मीपणा ठाव नुरेची पैं सर्वथा । प्रपंचाची कथा ब्रह्म जाली ॥३॥ बापनिवृत्तिराजे दाविताती खुण । नाम नारायणा पाठ कीजे ॥४॥