भजनी मालिका
← भजनांकडे परत

सायखडियाचें बिक

sayakhadiyachen bik

सायखडियाचें बिक । अचेत परि करी पाक । जनदृष्टीचें कवतुक । स्फ़ुरे वेगीं ॥१॥ तैसें हें देहरुप जालें । न होतेंचि होणें आलें । तंव सदगुरु जाणितलें । येथींचें रया ॥२॥ सतधनि म्हणे गुरु । जत सांभाळी विवरु । ऐसेंनि तुज वोगरु । वाढिला ब्रह्मीं ॥३॥ निराकार अलिप्त वसे । शरीरीं असोनि तूं नसे । एकत्त्व मनोद्देशें ह्रदयीं ध्यायें ॥४॥ सोडी रसाची रससोये नको भुलों माया मोहें । सत्रावी दोहतु जाये । जीवन भातें ॥५॥ ज्ञानदेव म्हणे श्रीगुरु । ऐसा सांगति विचारु । मग ब्रह्मीं चित्तानुसारु । निरोपिला सर्व ॥६॥