भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखादिसुख तें जाले अनमीष

sukhadisukh ten jale anamish

सुखादिसुख तें जाले अनमीष । पाहाणें तेंचि एक पारुषलें ॥१॥ काय सांगु मातु वेगळीच धातु । जिवा हा जिवांतु व्यापुनि ठेला ॥२॥ नचले नचले कांही कौटाल कामान । देहींच विंदान रचलेंगे माये ॥३॥ बापरखुमादेविवरें विठ्ठलें निटें । वायांविण विटे मिस केलें ॥४॥