भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाचिये गोठी सुख आलें भेटी

sukhachiye gothi sukh alen bheti

सुखाचिये गोठी सुख आलें भेटी । तया लाभाचिये साठीं जीव वेचिलागे माये ॥ तंव अवचितें सगुणरुप भरलेंसें नयनीं । बोलतां अंगणीं म्यां वो देखियेलें ॥१॥ जिवाचा जीऊ माझा भेटवा यादवराजा । उचलल्या चारी भुजा देईंल क्षेम ॥२॥ न करा उपचार न रंगे हें मन । दृष्टिपुढें ध्यान ठसावलें । आवडी गिळूनि येणें सुख विहरोनी ठेले । चित्त माझे गोविलें गोवळेनी ॥३॥ आतां भरोवरी उरवितां नुरे उरी । आनंदें अंतरीं कान्हो संचरला ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठल निर्गुण । तो सुखाची सांठवण गिळूनि ठेला ॥४॥