भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुंदरु राजसु सकुमारु बिंदुलें

sundaru rajasu sakumaru bindulen

सुंदरु राजसु सकुमारु बिंदुलें न साहे ज्यासी । स्वबुध्दि अळकारला परा ग्रासूनि ठेला मौन्य पडलें या शब्दांसी । पाहों जाय तंव पाहाणेंचि ग्रासी नवलावो काय या सुखासी । न अवलोकवे मना अवधारुनि ध्यानी आतां न विसंबे तुझिया पायासीं ॥१॥ हेम अळंकारु भेदु हा काय सगुणीं निर्गुणीं आहे तैसे गुण । गुळाचिनि अंगें गोडीपणें पाहातां न निवडे आतां मी काय करुं ॥२॥ म्हणौनि मन समावेश करणें तुझें तुजमाजीं घालणें येणें तुज अळंकारणें मध्यमणी मन चतुष्ट पदीं पदक तेंचि बैसका चोखट मन मनीं रुतलें ठेलें । आवडीचेनि अभ्यासें कोंदलिया दाही दिशा म्हणोनि प्रीति धरी सगुणीं रया ॥३॥ उभारलेनि सिडें जेथें स्वराज्य तारुं न बुडे ऐसें घडें वाडें कोडें तेचि कीजे । जेथें मनासीं कवण स्वप्नीं राज्य रक्षी जाण । आपुलें पारिखें नेणिजे म्हणोनियां आतां । बापरखुमादेवीवरा विठ्ठला शरण जाईजे रया ॥४॥