भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख तेथे दुःख दुःख तेथे सुख

sukh tethe duhkh duhkh tethe sukh

सुख तेथे दुःख दुःख तेथे सुख । एकी ते अनेक अनेकीं एक ॥१॥ देव तेथें भक्त भक्तापाशीं देव । जाणा एकमेव भेद नाहीं ॥२॥ तरूतळीं छाया छाया तेथें तरू । शिष्याठायीं गुरू गुरू शिष्य ॥३॥ कण तेचि भूमि भूमिरूपी कण । भासा ठायीं गुण गुणी भास ॥४॥ गुरूकृपे खूण वस्तु साक्षात्कार । भेदला ज्ञानेश्वर निवृत्तीचा ॥५॥