भजनी मालिका
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.

संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली. वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतांमध्ये त्यांचे स्थान अग्रगण्य आहे. आळंदी येथे त्यांची संजीवन समाधी आहे.

या संतांची भजने

न चलति शब्द खुंटले पै वाद । एक तत्त्व भेद नाहीं रुपा ॥१॥ तें रुप पंढरी भरलें चराचरीं । माझा माजी घरीं बिंबलेंसे ॥२॥

नभ नभाचेनि सळें । क्षोभु वाहिजे काळिंदी जळें । सासिंनले जगाचे डोळे । तें रुप पाहावया । भलतैसी हांव । मना न पुरे तेथींची धांव । लावण्यसिंधु सिंव सांडूनि जातो गे माये ॥१॥

नवल देखिलें कृष्णरुपीं बिंब । सांवळी स्वयंभ मूर्ति हरिची ॥१॥ मन निवालें बिंबलें समाधान जालें । कृष्णरुपें बोधलें मन माझें ॥ध्रु०॥