भजनी मालिका
← भजनांकडे परत

धर्म अर्थकाम मोक्ष दान मागे श्रीगुरु

dharma arthakam moksha dan mage shriguru

धर्म अर्थकाम मोक्ष दान मागे श्रीगुरु । हस्त पाद शरीर व्यथा पंगु जालों मी पुढारु । तिमिर आलें पुढें मायामोहो उदारु । तेणें मी जात होतों । मग सहज भेटला सदगुरु धर्म जागो सदगुरु महिमा जेणें तुटें भवव्यथा ॥१॥ हाचि धर्म अर्थ काम येर तें मी नेघे वृथा ॥२॥ एकनाम राम कृष्ण याचें दान देई सदगुरु । वेदशास्त्र मंथनकेले परि नव्हेचि पुढारु शरण आलों निवृत्तिराया तोडी माया संसारु । पाहतां इये त्रिभुवनी तुजहुनि नाहीं उदारु ॥३॥ ज्ञानेसहित विज्ञान गिळी मी माझें पागुळ । शंख चक्र पद्म गदा तुष्टे ऐंसा तूं दयाळ । बापरखमादोविवरें । दान देउनि केले अढळ ॥४॥