भजनी मालिका
← भजनांकडे परत

न चुकतां चुकलें

na chukatan chukalen

न चुकतां चुकलें । संसार वाटे भांबाविलें । अवचितें पडले ज्ञानपेठे वो माय ॥१॥ माझा निवृत्ति तूं सारा लाधला विकरा । गिर्‍हाइक पुरा विठ्ठल गे माय ॥२॥ कांहीं नाहीं उरले प्रेम वो माय ॥३॥ हा पुरोनिया उरला निजानंदु सांवळा । रखुमादेविवरु जोडला कष्टीं वो माय ॥४॥