भजनी मालिका
← भजनांकडे परत

नयनांतील रुप जो हें देखे पुरुष

nayanantil rup jo hen dekhe purush

नयनांतील रुप जो हें देखे पुरुष । त्याचे चरणीं वास असे माझा ॥१॥ नयनांतील ज्योती देखे गुह्यभावें । त्याचें स्वरुप भावें वंदावें गा ॥२॥ ज्ञानदेव म्हणे नयनांतील शून्य । देखे तोची धन्य भाग्यवंत ॥३॥