भजनी मालिका
← भजनांकडे परत

नयनाचें अंजन मनाचें रंजन

nayanachen anjan manachen ranjan

नयनाचें अंजन मनाचें रंजन । ठसा हा साधन बाईयानो ॥१॥ ॐकार अक्षर अक्षरीं हारपे । अनुभवाच्या मापें मोजूं बापा ॥२॥ बिंदूचें जें मूळ प्रणवाचें फळ । योगियाचें खेळ तेच ठायीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तिप्रसादें । स्वरुपाच्या विनोदें बोलिलें हें ॥४॥