भजनी मालिका
← भजनांकडे परत

ध्यानधारणामंत्र साधन

dhyanadharanamantra sadhan

ध्यानधारणामंत्र साधन । त्रिकाळीं जपन अजपासिध्दी ॥१॥ नटकेचि अटकु ठाईंचेंचि निर्गुण । मज कवणें ठाईं घेऊनि गेले ॥२॥ देश वाढले देश आटले । चहूंद्वारी कोंदलें ब्रह्मतेज ॥३॥ रखुमादेविवरु अठांगी आगळा । सप्तधातूं वेगळा ब्रह्मउदधि ॥४॥