भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवा आंत ओवरी औठपिठा जवळी

nava ant ovari authapitha javali

नवा आंत ओवरी औठपिठा जवळी । शून्यातीत काळी सुकुमार ॥१॥ अंगुष्ट पर्वार्ध मसुरा मात्र दीर्घ । उन्मनीचा मार्ग तेच ठायीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे पर्वार्धातील नीर । सर्व हें साचार विश्व दिसे ॥३॥