भजनी मालिका
← भजनांकडे परत

न गमे हा संसारु ह्मणोनि केला भ्रतारु

na game ha sansaru hmanoni kela bhrataru

न गमे हा संसारु ह्मणोनि केला भ्रतारु । लोक अनाचारु म्हणती मज ॥१॥ चंचळ जालिये म्हणतील मज । कवणा सांगूं । जिवीचें गूज ॥२॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलावांचुनि नेणें । सतत राहणें याचे पायीं ॥३॥