भजनी मालिका
संत चोखोबा

संत चोखोबा

या संतांची भजने

मुळींचा संचला आला गेला कोठें । पुंडलीक पेठे विटेवरी ॥१॥ विठोबा देखणा विठोबा देखणा । योगियांचा राणा पंढरिये ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

मोहळा मक्षिका गुंतली गोडीसी । तैशापरी मानसीं नाम जपे ॥१॥ मग तुज बंधन न घडे सर्वथा । राम नाम म्हणतां होसी मुक्त ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

याचिया छंदा जे लागले प्राणी । त्याची धुळधाणी केली येणें ॥१॥ याचा संग पुरे याचा संग पुरे । अंतरी ते उरे हांव हांव ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

यातीहीन मज म्हणती देवा । न कळे करूं तुमची सेवा ॥१॥ आम्हां नीचांचे तें काम । वाचें गावें सदां नाम ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

योग याग जप तप अनुष्ठान । नामापुढें शीण अवघा देखे ॥१॥ नामचि पावन नामचि पावन । अधिक साधन दुजें नाहीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

योग याग तप व्रत आणि दान । करितां साधन नाना कष्‍ट ॥१॥ सुलभ सोपेरें नाम विठोबाचें । सकळ साधनांचें मूळ बीज ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

राम हीं अक्षरें सुलभ सोपारी । जपतां निर्धारीं पुरे कोड ॥१॥ मागें बहुतांसी उद्धरिलें देखा । ऐसें बळ आणिका नाही अंगीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

लिहिलें संचितीं न चुके कल्पांतीं । वायां कुंथाकुंथीं करूनी काय ॥१॥ जन्ममरण सुखदु:खाचें गांठोडें । हें तों मागें पुढें बांधलेंसे ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

वाढलें शरीर काळाचें हें ग्वाजें । काय माझें तुझें म्हणतोसी ॥१॥ बाळ – तरुण दशा आपुलेच अंगीं । आपणची भोगी वृद्धपण ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

वांया हांव भरी गुंतले कबाडी । करिताती जोडी पुढीलाची ॥१॥ ऐसे तें वोंगळ देख आंधळे । भोगिताती बळें सुख दु:खं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

वांया हांव भरी नका घालूं मन । चिंतावे चरण विठोबाचे ॥१॥ हेंचि साधन साराचें सार । येणें भवपार उतरती ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

वारंवार किती करूं करकर । माझा तंव आधार खुंटलासे ॥१॥ न बोलावें आतां हेंचि शहाणपण । होउनी पाषाण पडो द्वारीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

वासुदेव दिंडी गान । प्रसाद मागूं आले दान । आणिक आले कोण कोण । त्यांची नावें परिसावी ॥१॥ ब्राम्हाण क्षत्रिय शूद्र वाणि । मागूं आल्या चारी खाणी । लिहिणार जोशी पंडित गणीं । चाटे भाट आले ते ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

विठोबा पाहुणा आला आमुचे घरा । निंबलोण करा जीवें भावें ॥१॥ पंचप्राण ज्योती ओंवाळुनी आरती । ओंवाळीला पती रखुमाईचा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ । पुराणें अमंगळ विटाळाचीं ॥१॥ जीवासी विटाळ शिवासी विटाळ । काया अमंगळ विटाळाची ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

वेध कैसा लागला वो जीवा । नाठवेचि हेवा दुजा कांहीं ॥१॥ पंढरीचे वाटे येती वारकरी । सुखाची मी करीं मात तयां ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

वैकुंठ पंढरी भिंवरेचे तीरीं । प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथें ॥१॥ रूप हें सांवळें गोड तें गोजिरें । धाणि न पुरे पाहतां जया ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

वोखटें गोमटें असोत नरनारी । दोचि अक्षरीं पावन होती ॥१॥ न लगे अधिकार वर्णावर्ण धर्म । नाम परब्रम्हा येचि अर्थीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

व्यापक व्यापला तिन्हीं त्रिभुवनीं । चारी वर्ण बाणी विठू माझा ॥१॥ पंचप्राण ज्योती ओंवाळुनी आरती । ओंवाळीला पती रखुमाईचा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा