भजनी मालिका
संत चोखोबा

संत चोखोबा

या संतांची भजने

बावरे मन रात्रंदिवस झालें । नावरे वाहिलें काय करूं ॥१॥ येणें माझा कैसा घेतिलासे लाहो । आतां कोठे जावो देशांतरीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

बैसोनि निवांत करीन चिंतन । काया वाचा मनसहित देवा ॥१॥ नामाचा आठव हेचि सोपें वर्म । अवघें कर्माकर्म पारूषती ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

भक्तांचिया लोभा वैकुंठ सांडिलें । उभेंचि राहिले पंढरीये ॥१॥ कनवाळु उदार तो हा श्रीहरी । जडजीवा उद्धरी नामें एका ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

भवाचिया भेणें येतों काकुळती । धांवे करुणामूर्ति देवराया ॥१॥ पडीलोंसे माया मोहाचीये जाळीं । येवोनी सांभाळी देवराया ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

भवाचें भय न धरा मानसीं । चिंता अहर्निशी रामनाम ॥१॥ मंत्र हा सोपा न लगे सायास । जपा रात्रंदिवस सुलभ तें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

भाकसमुद्रीं भरियेलीं केणें । आणियेलें नाणें द्वारकेचें ॥१॥ बाराही मार्गाची वणीज्ज करी । पंढर हे पुरी नामदेव ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

भाविकांच्या लोभा होऊनी आर्तभूत । उभाचि तिष्ठत पंढरीये ॥१॥ काय करों प्रेम न कळे या देवा । गुंतोनिया भावा राहे सुखें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

भेदाभेद कर्म न कळे त्याचें वर्म । वाऊगाचि श्रम वाहाती जगीं ॥१॥ नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । पाप ताप नयनीं न पडेचि ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

भ्रमण न करितां भागलों जी देवा । न मिळे विसावा मज कोठें ॥१॥ लागलेंसे कर्म आमुचे पाठारीं । आतां कोणावरी बोल ठेऊं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

मज तो नवल वाटतसे जीवी । आपुली पदवी विसरले ॥१॥ कवणिया सुखा परब्रम्हा भुललें । गुंतोनी राहिलें भक्तभाके ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

मज तों नवल वाटतसें जीवीं । आपुली पदवी विसरले ॥१॥ कवणिया सुखा परब्रह्म भुललें । गुंतोनी राहिलें भक्त भाके ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

मजचि कां करणें लागला विचार । परी वर्म साचार न कळे कांही ॥१॥ कैशी करुं सेवा आणिक ते भक्ति । न कळे विरक्ति मज कांही ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

महादोष राशि पापाचे कळप । नामें सुखरूप कलियुगीं ॥१॥ म्हणोनि आळस करूं नका कोणी । नाम जपा वाणी सर्वकाळ ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

माझा तंव अवघा खुंटला उपाय । रिता दिसे ठाव मजलागीं ॥१॥ करितोचि दिसे अवघेचि वाव । सुख दु:ख ठाव अधिकाधिक ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

माझा मी विचार केला असे मना । चाळवण नारायणा पुरें तुमचें ॥१॥ तुम्हांवरी भार घातिलेंसें वोझें । हेंचि मी माझें जाणतसें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

माझा शिण भाग अवघा हरपला । विठोबा देखिला विटेवरी ॥१॥ अवघ्या जन्मांचें सार्थक पैं झालें । समचरण देखिलें डोळेभरी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

माझ्या तो मनें केलासे विचार । आणिक प्रकार नेणें कांही ॥१॥ नाम वेळोवेळां आठवावे वाचे । दुजें आणिकांचें भय नाहीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

माझ्या मना तूं धरी कां विचार । न करी प्रकार आन कांहीं ॥१॥ पंढरीसी कोणी जाती वारकरी । सुखें त्यांचे घरी पशुयाती ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

माया मोहोजाळे गुंतलोंसे बळें । यांतोनी वेगळें करीं गा देवा ॥१॥ न कळेचि स्वार्थ अथवा परमार्थ । बुडालोंसे निभ्रांत याचमाजी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

मी तो विकलों तुमचिये पायीं । जीवभाव सर्वहि अर्पियेला ॥१॥ माझा मीच झालों उतराई देवा । तुमचें तुम्हीं पाहा आम्हांकडे ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा