भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या तो मनें केलासे विचार । आणिक प्रकार नेणें कांही

majhya to manen kelase vichar | anik prakar nenen kanhi

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
माझ्या तो मनें केलासे विचार । आणिक प्रकार नेणें कांही ॥१॥ नाम वेळोवेळां आठवावे वाचे । दुजें आणिकांचें भय नाहीं ॥२॥ आवडी बैसली विठूचे चरणीं । आतां दुजेपणीं नाहीं गोष्टी ॥३॥ चोखा म्हणे दृढ केलोसे संती । म्हणोनी विश्रांती जीवा झाली ॥४॥