भजनी मालिका
संत चोखोबा

संत चोखोबा

या संतांची भजने

आजि दिवस धन्य सोनियाचा । जीवलग विठोबाचा भेटलासे ॥१॥ तेणें सुख समाधान झाली विश्रांती । दुजे नाठवती चित्तीं कांही ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आजि सोनियाचा दिवस धन्य झाला । प्रत्यक्ष भेटला नामदेव ॥१॥ माझें मज दिलें माझें मज दिलें । माझें मज दिलें प्रेमसुख ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आणिक दैवतें देतीं काय बापुडीं । काय याची जोडी इच्छा पुरे ॥१॥ तैसा नव्हे माझा पंढरीचा राजा । न सांगता सहजा इच्छा पुरे ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आतां कणकण न करी वाउगी । होणार तें जगीं होउनी गेलें ॥१॥ दारीं परवरी झालोसे पोसणा । तुम्हांसी करुणा न ये कांहीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आतां कासया हा दाखवितां खेळ । म्यां तंव सकळ जाणितला ॥१॥ जेथें ब्रम्हादिक वेडे पिसे झाले । न कळे वहिलें तयांलागीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आतां कोठवरी करूं विवंचना । कां हे नारायणा तुम्हां न कळे ॥१॥ सांपडलों जाळीं गुंतलोंसे गळी । जीव हळहळीं वाऊगाचि ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आतां माझा सर्व निवेदिला भाव । धरोनी एक ठाव राहिलोंसे ॥१॥ जेथें काळाचाहि न पुरे हात । तयाचे पायीं चित्त समर्पिलें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आतां याचा अर्थ (संग) पुरे पुरे देवा । येऊं द्या कनवाळा तुम्हांलागी ॥१॥ गुंतलोंसे काढा यांतोनी बाहेरी । माझें तो हरि कांही न चाले ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आन साधनें सायास । कांहीं न करीं आयास नामाचाचि उल्हास । ह्रदयीं वास असावा ॥१॥ हेचि मागतसे देवा । हीच माझी भोळी सेवा । पायांसी केशवा । हाचि हेवा मानसीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आपुला विचार न कळे जयांसी । ते या संसाराशी पशू आले ॥१॥ पशूचा उपयोग बहुतांपरी आहे । हा तो वायां जाय नरदेह ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आपुलिया सुखा आपणचि आला । उगलाचि ठेला विटेवरी ॥१॥ तें हें सगुण रूप चतुर्भुज मूर्ति । शंख चक्र हातीं गदा पद्म ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावें । आहे नाहीं ठावें तुम्हां सर्व ॥१॥ वायांचि करणें लौकिकाचा गोवा । कोठवरी देवा बोलणें हें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आपुल्या स्वहिता वाचेसी उच्चारा । आळस न करा क्षणभरी ॥१॥ जाईल हा देह वाउगाचि उगा । अभ्रांची छाया जयापरी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आमुचा आम्ही केला भावबळी । भावें वनमाळी आकळीला ॥१॥ भावचि कारण भावचि कारण । भावें देव शरण भाविकासी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आमुचें संचित जैसें जैसें आहे । तेथें तो उपाय न चले कांही ॥१॥ सुखें आठवीन तुमचें हें नाम । न होय तेणें श्रम जीवा कांही ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आम्हां अधिकार उच्छिष्ट सेवन । संतांचे पूजन हेंचि बरें ॥१॥ सुलभ सोपारें विठोबाचें नाम । आणिक नाहीं वर्म दुजें काहीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आम्हां आनंद झाला आम्हां आनंद झाला । देवोचि देखिला देहामाजी ॥१॥ देखणें ऊडालें पाहणें लपालें । देवे नवल केलें देहामाजी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आम्हां न कळे ज्ञान न कळे पुराण । वेदांचे वचन न कळे आम्हां ॥१॥ आगमाची आठी निगमाचा भेद । शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा