भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां कणकण न करी वाउगी । होणार तें जगीं होउनी गेलें

atan kanakan na kari vaugi | honar ten jagin houni gelen

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आतां कणकण न करी वाउगी । होणार तें जगीं होउनी गेलें ॥१॥ दारीं परवरी झालोसे पोसणा । तुम्हांसी करुणा न ये कांहीं ॥२॥ होयाचें ते झालें असो कां उदास । धरोनिया आस राहों सुखी ॥३॥ चोखा म्हणे मज हेंचि बरें दिसे । न लावीं पिसें जीवा कांही ॥४॥