भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचा आम्ही केला भावबळी । भावें वनमाळी आकळीला

amucha amhi kela bhavabali | bhaven vanamali akalila

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आमुचा आम्ही केला भावबळी । भावें वनमाळी आकळीला ॥१॥ भावचि कारण भावचि कारण । भावें देव शरण भाविकासी ॥२॥ निज भावबळें घातिलासे वेढा । देव चहूंकडा कोंडियेला ॥३॥ चोखा म्हणे देव भावाचा बांधला । भक्तांचा अंकिला म्हणुनी झाला ॥४॥