भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुला विचार न कळे जयांसी । ते या संसाराशी पशू आले

apula vichar na kale jayansi | te ya sansarashi pashu ale

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आपुला विचार न कळे जयांसी । ते या संसाराशी पशू आले ॥१॥ पशूचा उपयोग बहुतांपरी आहे । हा तो वायां जाय नरदेह ॥२॥ परि भ्रांति भुली पडलीसे जीवा । आवडी केशवा नाठविती ॥३॥ चोखा म्हणे नाम जपतां फुकाचें । काय याचें वेचे धन वित्त ॥४॥