भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावें । आहे नाहीं ठावें तुम्हां सर्व

apulya apan sambhaloni ghyaven | ahe nahin thaven tumhan sarva

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावें । आहे नाहीं ठावें तुम्हां सर्व ॥१॥ वायांचि करणें लौकिकाचा गोवा । कोठवरी देवा बोलणें हें ॥२॥ अंगा नाहीं आलें तंव तें साहालें । खादलें पचलें तरी तें हित ॥३॥ चोखा म्हणे तुमचें तुम्हासी सांगणें । माझें यांत उणें काय होतें ॥४॥