भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा शिण भाग अवघा हरपला । विठोबा देखिला विटेवरी

majha shin bhag avagha harapala | vithoba dekhila vitevari

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
माझा शिण भाग अवघा हरपला । विठोबा देखिला विटेवरी ॥१॥ अवघ्या जन्मांचें सार्थक पैं झालें । समचरण देखिलें डोळेभरी ॥२॥ चंद्रभागे तीरीं नाचती वारकरी । विठ्ठलनाम गजरीं आनंदानें ॥३॥ दिंडया गरुड टके पताकांचे भार । होतो जयजयकार नामघोष ॥४॥ तो सुखसोहळा देवांसी दुर्लभ । आम्हां तो सुलभ चोखा म्हणे ॥५॥