भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाढलें शरीर काळाचें हें ग्वाजें । काय माझें तुझें म्हणतोसी

vadhalen sharir kalachen hen gvajen | kay majhen tujhen mhanatosi

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
वाढलें शरीर काळाचें हें ग्वाजें । काय माझें तुझें म्हणतोसी ॥१॥ बाळ – तरुण दशा आपुलेच अंगीं । आपणची भोगी वृद्धपण ॥२॥ आपुला आपण न करी विचार । काय हे अमर शरीर याचें ॥३॥ चोखा म्हणे भुलला मोहळाचे परी । मक्षिके निर्धारी वेढियेला ॥४॥