भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठ पंढरी भिंवरेचे तीरीं । प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथें

vaikunth pandhari bhinvareche tirin | pratyaksha shrihari ubha tethen

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
वैकुंठ पंढरी भिंवरेचे तीरीं । प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथें ॥१॥ रूप हें सांवळें गोड तें गोजिरें । धाणि न पुरे पाहतां जया ॥२॥ कांसे सोनसळा नेसला पिंवळा । वैजयंती माळा गळां शोभे ॥३॥ चोखा म्हणे ऐसें सगुण हें ध्यान । विटे समचरण ठेवियेले ॥४॥