भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ । पुराणें अमंगळ विटाळाचीं

vedasi vital shastrasi vital | puranen amangal vitalachin

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ । पुराणें अमंगळ विटाळाचीं ॥१॥ जीवासी विटाळ शिवासी विटाळ । काया अमंगळ विटाळाची ॥२॥ ब्रम्हिया विटाळ विष्णूसी विटाळ । शंकरा विटाळ अमंगळ ॥३॥ जन्मतां विटाळ मरतां विटाळ । चोखा म्हणे विटाळ आदिअंती ॥४॥