भजनी मालिका
← भजनांकडे परत

योग याग तप व्रत आणि दान । करितां साधन नाना कष्‍ट

yog yag tap vrat ani dan | karitan sadhan nana kash‍ta

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
योग याग तप व्रत आणि दान । करितां साधन नाना कष्‍ट ॥१॥ सुलभ सोपेरें नाम विठोबाचें । सकळ साधनांचें मूळ बीज ॥२॥ येणें भवव्यथा तुटेल जीवाची । प्रतिज्ञा संतांची हीच असे ॥३॥ म्हणोनि नामाचा करा गदारोळा । म्हणे चोखामेळा विठ्‌ठल वाचे ॥४॥