भजनी मालिका
← भजनांकडे परत

योग याग जप तप अनुष्ठान । नामापुढें शीण अवघा देखे

yog yag jap tap anushthan | namapudhen shin avagha dekhe

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
योग याग जप तप अनुष्ठान । नामापुढें शीण अवघा देखे ॥१॥ नामचि पावन नामचि पावन । अधिक साधन दुजें नाहीं ॥२॥ कासया फिरणें नाना तीर्थाटणी । कासया जाचणी काया क्लेश ॥३॥ चोखा म्हणे सुखे जपता विठ्ठल । सुफळ होईल जन्म त्याचा ॥४॥