भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेध कैसा लागला वो जीवा । नाठवेचि हेवा दुजा कांहीं

vedh kaisa lagala vo jiva | nathavechi heva duja kanhin

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
वेध कैसा लागला वो जीवा । नाठवेचि हेवा दुजा कांहीं ॥१॥ पंढरीचे वाटे येती वारकरी । सुखाची मी करीं मात तयां ॥२॥ माझ्या विठोबाचें गाती जे नाम । ते माझे सुखधाम वारकरी ॥३॥ लोटांगणें सामोरा जाईन तयांसी । क्षेम आनंदेसी देईन त्यांसी ॥४॥ चोखा म्हणे माझा प्राणाचा तो प्राण । जाईन वोवाळोन जीवें भावें ॥५॥