भजनी मालिका

भजने

होऊनि हरण राहिला ते वनीं । दोघी त्या हरिणी स्रिया झाल्या ॥१॥ जातीच्या स्वभावें करिती विहार । चित्त झालें स्थिर एकमेकां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

होऊनियां तुह्मी वनींचीं वनचरें । बोलतसां फार धर्मा-धर्म ॥१॥ येणें कांहीं कांहीं द्रव आला मना । तुमची भावना कोण जाणे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

होऊनियां तेचि राहिले निवांत । रुपीं अखंडित होउनी संत ॥१॥ नित्य निरामय अखंड अव्दय । ध्याती देवत्रय ज्यातें सदा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

होणार जणार न चुके कल्पांतीं वाउगी । कुंथाकुंथी करुनी काय ॥१॥ लिहिलें संचितें न चुके कल्पांतीं । वाउगाचि भ्रांतीं फळ काय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

होतां द्वारपाल लाज वाटे थोरी । न साहे भिकारी जाला हरी ॥१॥ बळीच्या तो द्वारी सारथीं पर्थाचा । गोसावी आमुचा वेदवाणी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

होता प्रात:काळ सांगतसे तया । जावें येथोनियां शीघ्र आतां ॥१॥ क्षणोक्षणा पाहाती देवाजीचें मुख । येती सक-ळीक गोकुळासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

होतीं नेणों जालीं कठिणें कठीण । जवळी च मन मनें ग्वाही ॥१॥ आह्मी होतों सोइ सांडिला मारग । घडिलें तें मग तिकून ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

होतें तैसें पांई केलें निवेदन । अंतरलों दीन बहुत होतों ॥१॥ संबोखून केले समाधान चित्ता । वोगरुनि भाता प्रेमरस ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

होतें बहुत दिवस आर्त वागविलें । आजी अकत्मात तें फळ देऊं आलें । दृष्टी श्रीहरीची देखिलीं पाऊलें । घेतलें जन्म मागें सार्थक त्यांचे झालें वो ॥१॥ धन्य हे आनंदाची सापडली वेळ । तेणें संत सज्जन भेटले कृपाळ । त्यांनींचि फेडियेला बुध्दीचा वो मळ । दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

होतें बहुत दिवस मानसीं । आजि नवस हे फळले नवसीं । व्हावी भेटी ते झाली गोविंदासीं । आतां सेवा करीन निश्चयेसीं वो ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

होतें लेउनियां आतींचे अंजन । तेणें देखिलें वो निक्षेपीचें धन । होतें वेदरायें ठेविलें जोडून । तेंचि सांपडलें आईतें निधान वों ॥१॥ जनीं जनार्दन प्रत्यक्षचि होता । तोचि मुसावोनि कृष्ण झाला आतां । मंडित चतुर्भज वेणुवाजविता । मुकुट कुंडले वो माळाचा मिरवता वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

होतों तें चिंतीत मानसीं । नवस फळले नवसीं । जोडिते नारायणा ऐसी । अविट ज्यासी नाश नाहीं ॥१॥ धरिले जीवीं न सोडीं पाय । आलें या जीवित्वाचें काय । कैं हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचितानें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम