भजनी मालिका
← भजनांकडे परत

होतों सांपडलों वेठी । जातां भेटी संसारा

hoton sampadalon vethi | jatan bheti sansara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
होतों सांपडलों वेठी । जातां भेटी संसारा ॥१॥ तों या वाटे कृपा केली । भेटी जाली विठोबासी ॥ध्रु.॥ होता भार माथां माझे । बहु ओझें अमुप ॥२॥ तुका म्हणे केली चिंता । कोण दाता भेटेल ॥३॥