भजनी मालिका
← भजनांकडे परत

होती पोटासाठीं संत । नाहीं हेत विठ्ठली

hoti potasathin sant | nahin het viththali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
होती पोटासाठीं संत । नाहीं हेत विठ्ठली ॥१॥ तयांचा उपदेश नये कामा । कोण धर्मा वाढवी ॥२॥ घालुनी माळा मुद्रा गळां । दाविती जिव्हाळा वरवरी ॥३॥ एका जनार्दनीं ते पामर । भोगिती अघोर यातना ॥४॥