भजनी मालिका
← भजनांकडे परत

होतीं नेणों जालीं कठिणें कठीण । जवळी च मन मनें ग्वाही

hotin nenon jalin kathinen kathin | javali cha man manen gvahi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
होतीं नेणों जालीं कठिणें कठीण । जवळी च मन मनें ग्वाही ॥१॥ आह्मी होतों सोइ सांडिला मारग । घडिलें तें मग तिकून ही ॥ध्रु.॥ निश्चिंतीनें होते पुढिलांची सांडी । न चाले ते कोंडी मायबापा ॥२॥ आम्हां नाहीं त्यांचा घडिला आठव । त्यांचा बहु जीव विखुरला ॥३॥ तुका म्हणे जालें धर्माचें माहेर । पडिलें अंतर आम्हांकूनि ॥४॥