भजनी मालिका
← भजनांकडे परत

होता प्रात:काळ सांगतसे तया । जावें येथोनियां शीघ्र आतां

hota prat:kal sangatase taya | javen yethoniyan shighra atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
होता प्रात:काळ सांगतसे तया । जावें येथोनियां शीघ्र आतां ॥१॥ क्षणोक्षणा पाहाती देवाजीचें मुख । येती सक-ळीक गोकुळासी ॥२॥ परिक्षिती ऐके ऐका कौतुकासी । होत्या त्यांज-पाशीं त्याच्या स्त्रिया ॥३॥ ह्मणोनियां कोणी नाहीं विचारिलें । अंतरीं न कळे दुजियाला ॥४॥ यथामती रास वर्णिला देवाचा । संपूर्ण हे वाचा काय करी ॥५॥ चरित्र श्रवण करील जो कोणी । धन्य तोचि प्राणी नामा ह्मणे ॥६॥