राजस सुकुमार मदनाचा पुतळा
rajas sukumar madanacha putala
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥
rajas sukumar madanacha putala
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥
sada majhe dole jado tujhe murti
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
avade hen rup gojiren sagun
आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहातां लोचन सुखावलें ॥१॥
jhani drushti lago tujhya sagunapana
झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा । जेणे माझ्या मना बोध केला ।।१।।
pahatan shrimukh sukhavalen sukh
पाहातां श्रीमुख सुखावलें सुख । डोळियांची भूक न वजे माझ्या ॥१॥
yenen mukhen tujhe varni gun nam
येणें मुखें तुझे वर्णी गुण नाम । तें चि मज प्रेम देई देवा ॥१॥ डोळे भरूनियां पाहें तुझें मुख । तें चि मज सुख देई देवा ॥ध्रु.॥
nako brahmadnyan atmasthitibhav
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव । मी भक्त तूं देव ऐसे करी ।।१।।
unchaninch nenen bhagavant
उंचनिंच नेणें भगवंत । तिष्ठे भाव भक्ती देखोनियां ॥१॥
shravanen kirtanen jale te pavan
श्रवणें कीर्तनें जाले ते पावन । सनकादिक जाण परम भक्त ॥१॥
bahu utavil bhaktichiya kaja
बहु उतावीळ भक्तीचिया काजा । होसी केशीराजा मायबापा ॥१॥ तुझ्या पायीं मज जालासे विश्वास । म्हणोनियां आस मोकलिली ॥ध्रु.॥
punyavant vhaven
पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें ॥१॥ नेघे माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठी ॥ध्रु.॥
utha utha sadhusant
उठा उठा साधुसंत । साधा आपुलें हित । गेला गेला हा नरदेह । मग कैंचा भगवंत ॥ध्रु०॥ उठुनी वेगेशीं चला जाऊं राउळाशी । जळती पातकाच्या राशी । काकड आरती देखिलिया ॥१॥
utha utha prabhat jahali
उठा उठा प्रभात जाहली । चिंता श्रीविठ्ठ्ल माउली । दीन जनांची साउली । येई धांउनी स्मरतांचि ॥१॥ पंढरपुरीं जे भिमातटीं । सुंदर मनोहर गोमटी । दोन्ही कर ठेविनियां कटीं । भेटीसाठीं तिष्ठतसे ॥२॥
utha jage vhare atan
उठा जागे व्हारे आतां । स्मरण करा पंढरिनाथा । भावें चरणीं ठेवा माथा । चुकवी व्यथा जन्माच्या ॥१॥ धन दारा पुत्रजन । बंधु सोयरे पिशून । सर्व मिथ्या हे जाणून । शरण रिघा देवासी ॥२॥
utha panduranga atan darshan dya sakalan
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां । झाला अरुणोदय सरली निद्रेचीवेळा ॥१॥ संत साधु मुनि अवघे झालेती गोळा । सोडा शेजेसुख आतां पाहूंद्या मुखकमळा ॥२॥
utha arunoday prakash jahala
उठा अरुणोदय प्रकाश जाहला । घंटा गजर गर्जित्रला। हरी चौघडा सुरू झाला । काकड आरती समयाचा ।।१।।
bhaktichiya poti bodh kakada jyoti
भक्तिचिया पोटी बोध काकडा ज्योती । पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती ।।१।। ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा। दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविन माथा ।।२।।
sahasra dipe dip kaisi prakashali prabha
सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा। उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ।।१।। काकड आरती माझ्या कृष्ण सभागीया। चराचर मोहरलें तुझी मूर्ति पाहाया ।।२।।
kanakachya pariyelin ujaluni arati
कनकाच्या परियेळीं उजळूनि आरती । रत्नदीपशोभा कैशा पाजळल्या ज्योती ॥१॥ ओंवाळूं गे माये सबाह्य साजिरा । राहिरखुमाईसत्यभामेच्या वरा ।ध्रु.॥
tujhiye nidhalin koti chandra prakashe
तुझिये निढळीं कोटि चंद्र प्रकाशे ॥ कमल नयन हास्य वदन हांसे ॥१॥