भजनी मालिका
← भजनांकडे परत

उंचनिंच नेणें भगवंत

unchaninch nenen bhagavant

उंचनिंच नेणें भगवंत । तिष्ठे भाव भक्ती देखोनियां ॥१॥ दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्या घरीं रक्षी प्रल्हादासी ॥ध्रु.॥ चर्म रंगूं लागे रोहिदासा संगीं । कबिराचे मागीं शेले विणी ॥२॥ सजनकसाया विकुं लागे मास । मळा सांवत्यास खुरपूं लागे ॥३॥ नरहरीसोनारा घडु फुंको लागे । चोख्यामेळ्या संगें ढोरें ओढी ॥४॥ नामयाची जनी सवें वेची सेणी । धर्मा घरीं पाणी वाहे झाडी ॥५॥ नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित । ज्ञानियाची भिंत अंगीं ओढी ॥६॥ अर्जुनाचीं रथीहोय हा सारथी । भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची ॥७॥ गौळियांचे घरीं अंगें गाई वळी । द्वारपाळ बळीद्वारीं जाला ॥८॥ यंकोबाचें ॠण फेडी हृषीकेशी । आंबॠषीचे सोशी गर्भवास ॥९॥ मिराबाई साठी घेतो विषप्याला । दामाजीचा जाला पाडेवार ॥१०॥ घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची। हुंडी त्या मेहत्याची अंगें भरी ॥११॥ पुंडलिकासाठी अझूनि तिष्ठत । तुका म्हणे मात धन्य त्याची ॥१२॥