भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुण्यवंत व्हावें

punyavant vhaven

पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें ॥१॥ नेघे माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठी ॥ध्रु.॥ विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥२॥ तुका म्हणे पापें । जाती संतांचिया जपें ॥३॥