भजनी मालिका
← भजनांकडे परत

कनकाच्या परियेळीं उजळूनि आरती

kanakachya pariyelin ujaluni arati

कनकाच्या परियेळीं उजळूनि आरती । रत्नदीपशोभा कैशा पाजळल्या ज्योती ॥१॥ ओंवाळूं गे माये सबाह्य साजिरा । राहिरखुमाईसत्यभामेच्या वरा ।ध्रु.॥ मंडितचतुर्भुज दिव्य कानीं कुंडलें। श्रीमुखाची शोभा पाहातां तेज फांकलें ॥२॥ वैजयंती माळ गळां शोभे श्रीमंत । शंखचक्रगदापद्म आयुधें शोभत ॥३॥ सांवळा सकुमार जैसा कर्दळीगाभा । चरणीचीं नेपुरें वांकी गर्जती नभा ॥४॥ ओंवाळितां मन हें उभें ठाकलें ठायीं । समदृष्टि समान तुकया लागली पायीं ॥५॥