भजनी मालिका
← भजनांकडे परत

नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव

nako brahmadnyan atmasthitibhav

नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव । मी भक्त तूं देव ऐसे करी ।।१।। दावी रूप मज गोपिकारमणा। ठेवू दे चरणांवरी माथा ।।२।। पाहीन श्रीमुख देईन आलिंगन । जीवें निंबलोण उतरीन ।।३।। पुसता सांगेन हितगुज मात। बैसोनी एकांत सुख गोष्टी ।।४।। तुका म्हणे यासी न लावी उशीर। माझे अभ्यंतर जाणोनियां ।।५।।