भजनी मालिका

भजने

यज्ञादिक कर्म करूनि ब्राह्मण । दंभ आचरण दावी लोकां ॥१॥ लोकांसी दाविती मीच कर्मनिष्थ । अभिमान खोटा वागविती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

यज्ञोपवित सांडिलें दुरी । शिखासूत्राची बोहरी । करुनियां मोहरी करीं । कांठी कांवळा गांजिवा ॥१॥ उफराटी पडदणीं खेविली टिरी । सूक्ष्म शेंडी बोडक्यावरी । दृष्टी चोरुनियां माझारी । माजी गोवळांच्या नाचतो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यथार्थ वाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥१॥ चोरा धरितां सांगे कुठोऱ्याचें नांव । दोघांचे ही पाव हात जाती ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

यथार्थवादें तुज न वर्णवे कदा । बोलतों ते निंदा करितों तुझी । वेदश्रुति तुज नेणती कोणी । चोवीस ठेंगणीं धांडोळितां ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

यम सांगे दूतां । तुह्मीं जावें मृत्युलोका । आपुलाला लोक जितुका । तितुका आणावा ॥१॥ तुह्मां सांगतों कुळरंग । निंदा द्वेष करिती राग । खरी खोटी चाहडी सांगे । ते कुळ आ-पुलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

यम सांगे दूतां तुम्हां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय कथा सदा घोष नामाचा ॥१॥ नका जाऊं तया गांवां नामधारकाच्या शिवां । सुदर्शन येवा घरटी फिरे भोंवती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

यमधर्मही इच्छी भेटी । हरिभक्तां दृष्टीं पहावया ॥१॥ म्हणे त्यांच्या मुखें कथा । होईन ऐकतां पावन मी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यमपुरी त्यांणीं वसविली जाणा । उच्छेद भजना विधी केला ॥१॥ अवघड कोणी न करी सांगतां । सुलभ बहुतां गोड वाटे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

यमाचिया नगरीं दोघेजण गेले । शंखातें स्फुरीलें कृष्ण-नाथें ॥१॥ ऐकोनियां नाद कांपतसे काळ । उठिले सकाळ पाहावया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

यमुनें पाबळीं । गडियां बोले वनमाळी । आणा सिदोर्‍या सकळी । काला करूं आजी । अवघें एके ठायीं । करूनि स्वाद त्याचा पाहीं । मजपाशीं आहे तें ही । तुम्हामाजी देतों ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

यमुने पाबळी देखियेली मूर्ती । तळपती दीप्ति तेजो-मय ॥१॥ सांवळें सुंदर ओंकार वर्तुळ । मध्यें घननीळ पाचारितो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

यमुनेचे तीरीं नवल परि वो । तेथें गोपाळ वत्सें स्वयं झाला हरी वो ॥१॥ नवल देखा ठक तिन्हीं लोकां । भुली ब्रह्मादिकां पार नाहीं सुखा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ